‘हिरकणी’ नंतर सोनाली कुलकर्णी दिसणार ‘छत्रपती ताराराणी’ मध्ये

No Comment Yet

चला हवा करू या  – हिरकणी चित्रपटातील हिरकणी च्या रोल मुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर तिने डेट भेट व फ्रेश लाईम सोडा या चित्रपटांचे चित्रीकरण केले व आता ती छत्रपती ताराराणी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रसिद्ध झाले.

ताराराणी ची भूमिका कोण साकारत आहे हे कळल्यानंतर आता या चित्रपटातील बाकी कलाकार कोण असतील, याची उत्सुकता अजून वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जाधव करीत आहेत.या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला चला हवा करू या तर्फे हार्दिक शुभेच्छा..

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *