डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित ‘तू माझा होऊन ये’ गाण्याचं पोस्टर अनावरण पुनीत बालन ह्यांच्या हस्ते संपन्न ..

No Comment Yet


UNM PRODUCTION AND FILMS प्रस्तुत, डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित ” तू माझा होऊन ये ” ह्या नवीन अल्बम साँग चा पोस्टर अनावरण सोहळा पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे पुनीत बालन ह्यांच्या हस्ते पार पडला , ह्या वेळी गाण्याचे दिग्दर्शक डॉ. कृणाल मेथा , गीतकार निलेश कटके, अभिनेता गौरव भोसले, सृष्टी आंबावले, करण राजगे , साक्षी करवा आदी मंडळी उपस्थित होते. गाण्याचं लेखन निलेश कटके ह्यांनी केलं असून केवल वलांज आणि सोनाली सोनावणे ह्यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं आहे. तसेच संगीत व्यवस्थान अनुराग गोडबोले ह्यांनी केलं आहे. नंदकिशोर मेथा निर्मिते असून डॉ. संकेत ढेकळे सहनिर्माते आहेत. गाण्यात सृष्टी अंबावले आणि डॉ. गौरव भोसले प्रमुख भूमिकेत असून करण राजगे , नम्रता जगदाळे , हृषिकेश लेकावळे आणि अभिनंदन गायकवाड हे सह कलाकार आहेत.

“तू माझा होऊन ये” २१ जानेवारी २०२३ पासून प्रदर्शित आहे. गाण्याचं पोस्टर अनावरण पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन ह्यांच्या हस्ते पार पडला. ह्या वेळी उपस्थितीत कलाकारांशी गाण्याबद्दल संवाद साधला आणि संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.
गाण्यात सृष्टी अंबावले आणि डॉ. गौरव भोसले प्रमुख भूमिकेत असून करण राजगे , नम्रता जगदाळे , हृषिकेश लेकावळे आणि अभिनंदन गायकवाड हे सह कलाकार आहेत. राज शिंदे हे नृत्य दि्दर्शक असून भागवत सोनावणे ह्यांनी रंगभूषा केली आहे.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *