डॅडींच्या जावयाचा, ‘खुर्ची’ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर

No Comment Yet

चला हवा करू या  – ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील & ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह राजकीय नाट्याचा अंदाज दर्शविणारे ‘खुर्ची’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. खुर्ची साठी होणाऱ्या राजकारणाची झलक आपण याआधी ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि ‘धुरळा’सारख्या चित्रपटांमधून पाहिली. सत्तेच्या अभावी जाऊन सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पहायला मिळाले.

मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये खुर्ची साठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे.

Khurchi

Khurchi

या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर, आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांची सहनिर्मिती असून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शविणारा आहे. गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे.

ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *