चला हवा करू या – झी-मराठी वरील शनायाच्या भूमिकेमुळे गाजलेली अभिनेत्री रसिका सुनील आपल्या चाहत्यांना परत एका नवीन भूमिकेत सर्वांना दिसणार आहे. लॉकडाउन नंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका जेव्हा परत सुरू झाली तेव्हा रसिका शनाया च्या भूमिकेत परत आली व डिसेंबर महिन्याच्या शेवटी तिने मालिकेतून एक्झिट घेतली व ती अमेरिकेला गेली. पण आता ती परत आली आहे, परत आल्यानंतर तिने फकाट या श्रेयश जाधव च्या चित्रपटाचे चित्रीकरण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हेमंत ढोमे, सुयोग गोर्हे,अभिनेत्री अनुजा साठे हे कलाकार दिसणार आहेत.
रसिकाने नुकताच सोशल मीडिया वर एक फोटो शेअर केला ज्याला तिने on the sets of असे caption दिले आहे. आता हा सेट कोणता, रसिका कोणत्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची उत्सुकता आहे..
रसिकाच्या या नवीन प्रोजेक्टला आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा…