चला हवा करू या (प्राची बोरामणीकर) –गुरुनाथ सुभेदार हे नाव आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतल्या गुरुनाथ म्हणजेच अभिजीत खांडकेकर याने आपल्या सोशल मीडिया द्वारे आपल्या फॅन्स ला एक छान बातमी दिली आहे. अभिजीतने प्लॅनेट मराठी या अक्षय बर्दापुरकर यांच्या OTT प्लॅटफॉर्म साठी एका मराठी वेब सीरिजचे शूटिंग करायला सुरुवात केली आहे. ही वेब सीरिज प्लॅनेट मराठीची पहिली वेब सीरिज असून या सीरिज चे नाव अद्याप ठरायचे आहे.
अभिजीत खांडकेकर सह मृण्मयी देशपांडे आणि शशांक केतकर हे या सीरिज चे मुख्य कलाकार असून आपल्याला आनंद इंगळे हे पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसतील. विप्लवा एंटरटेनमेंट्स प्रस्तुत, संतोष गुजराथी निर्मित या वेब सिरिजचे दिग्दर्शक व लेखक मयुरेश जोशी आहेत. अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांना आपण खूपदा एकत्र सूत्रसंचालन करताना पाहिलं आहे, मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटात देखील त्यांनी एकत्र काम केले होते आणि नुकतंच झी मराठी वर महाराष्ट्राची लावण्यवती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शशांक केतकरची देखील झी मराठी वाहिनीवर “पाहिले न मी तुला” ही मालिका १ मार्च पासून चालू होणार आहे.या वेबसिरीज शी संलग्न सर्व चमूला चला हवा करू या तर्फे हार्दिक शुभेच्छा!