कलरफुल जोडी चा कलरफुल चित्रपट

No Comment Yet

चला हवा करू या  – २०२० हे वर्ष सिनेमा चाहत्यांसाठी फारच कठीण गेले होते.कोरोना चा काळात चित्रपट घृह बंद करण्यात आली होती. पण जशी परिस्थिती थोडी सुधारली व थोडे नियम हलके झाले तसेच सिनेमागृह उघडण्यास पवानगी मिळाली. सरकार चा या बातमीने सिनेमा रसिकांचे आयुष्य पुन्हा मनोरंजनाच्या रंगाने भरून गेले आणि जुलै महिन्यात असाच एक रंगांनी भरलेला ‘कलरफुल’ चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर असून प्रकाश कुंटे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि याची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाचे पोस्टर नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे आणि या पोस्टर मध्ये पायऱ्यांवर बसलेल्या सई आणि ललितची जोडी फारच सुंदर दिसत आहे. पोस्टर मधला त्यांचा लूक आणि कानाला लावलेल्या फुलाने लोकांचे लक्ष वेधून‌ घेतले आहे.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *