सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधील ‘हा’ चेहरा आता झळकतोय मराठी मालिकेत…

No Comment Yet

चला हवा करू या  – कसौटी जिंदगी की,इशकबाझ, मेरी आवाज ही पहचान है, बालवीर, एक हसीना थी या सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री स्वाती पानसरे आता , माझी तुझी रेशीमगाठ या सुप्रसिद्ध मराठी मालिकेतून आपल्या भेटीस आली आहे. या मालिकेत ती मिथिला ची भूमिका साकारत आहे. मिथिला च्या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत, ती काहीशी भोळी, काहीशी कॉमेडी, आणि थोडीशी इमोशनल आहे.

स्वाती यांनी या आधी तनिष्क, डॉय सोप, डिलाईट नट्स, केसरी टूर्स, HDFC होम लोन या आणि अशा अनेक जाहिराती,तसेच १२ मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, आप्पा आणि बाप्पा या सुप्रसिद्ध चित्रपटात त्यांनी भरत जाधव आणि सुबोध भावे यांच्यासोबत, तसेच माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटात अनिकेत विश्वासराव आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत काम केले आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. यातली सर्वच कॅरॅक्टर्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. एवढेच नव्हे तर या मालिकेवरील मीम्स सुद्धा प्रचंड गाजत आहेत.

या मालिकेमधील कलाकारांचे रिल्स सुद्धा सध्या इन्स्टाग्राम वर पाहायला मिळत आहेत.सर्व कलाकारांची व स्क्रीन तसेच ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूप छान रंगली आहे.माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका नुकतीच झी मराठी वर सुरू झाली असून ती तुम्हाला सोम-शनि रात्री ८:३० वाजता बघता येईल.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *