चला हवा करू या – सरसेनापती हंबीरराव या प्रवीण तरडे दिग्दर्शित चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आज शिवजयंतीचे औचित्य साधून महाराजांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता गष्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेता रमेश परदेशी, तसेच दिग्दर्शक प्रवीण तरडे स्वतः प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण लॉकडाऊन च्या काहीच दिवस आधी झाले होते आणि जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण कोव्हिड मुळे हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे..