चला हवा करू या – लेखक दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नवीन चित्रपट शेर शिवराज है या नवीन चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट अफझलखानाचा वध या कथेवर बेतलेला आहे. दिग्पाल यांनी या आधी फर्जंद, फत्तेशिकस्त या इतिहासपटांचे दिग्दर्शन केले आहे.. तसेच जंगजौहर हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. शेर शिवराज है हा शिवरायांच्या जीवनावर बेतलेला दिगपाल यांचा चौथा चित्रपट असणार आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कोण कलाकार असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.