अगदी म्हणावं तर आपल्याच अवती भोवती एका लग्नकार्याची लगबग सुरू आहे, इतकंच काय तर या सिनेमाचे तिकीट म्हणजेच लग्नपत्रिकाच देऊनच डॉ.सलील कुलकर्णी यांनी परी-प्रकाश यांच्या लग्नाचे आमंत्रण प्रत्येक प्रेक्षकांना दिलंय असं वाटेल,
प्रिवेडिंग शुट मधुन या वेडिंग च्या सिनेमाची कथा उलगडत जाते, परी आणि प्रकाश म्हणजेच ऋचा इनामदार व शिवराज वायचळ यांच्या प्रेमाची सेटिंग मॅक म्हणजेच प्रवीण तरडे यांनी लाऊन करून दिली,
नक्कीच प्रवीण आणि शिवराज यांची कमाल जोडी आणि ट्युनिंग जमलेले आपल्याला पाहायला मिळेल, डॉक्टर परी ही शहरातून सासवडला ग्रामीण रुग्णालयात प्रॅक्टिससाठी आलेली असते आणि आपला नायक म्हणजेच प्रकाश हा मोबाईल विक्री व्यवसाय करत असतो. झट की पट जुळलेल्या प्रेमात परी चा सोज्वळ सौम्य आवाज आणि गोड हास्य प्रत्येकाच्या मनात नक्की ठसते,
प्रिवेडिंग शुट करता करता एका मोठ्या संधी च्या प्रतीक्षेत आसलेली उर्वी (मुक्ता बर्वे) ही एक सुंदर आशयाची कथा शोधत असते, आणि या प्रिवेडिंग शुट निमित्त नायक आणि नायिकेच्या शहरी-ग्रामीण परिवारांची केमिष्ट्री सुद्धा उलघडत जाते. अलका कुबल,शिवाजी साटम, सुनील बर्वे, अश्विनी कळसेकर
भाऊ कदम,संकर्षण कऱ्हाडे,योगिनी पोफळे, प्राजक्ता हणमघर ही मंडळी सुद्धा अगदी सगळ्यांची जमवलेली गट्टी आणि यातूनच एक साधी सरळ एकसारख्या स्पीडने जाणारी पटकथा आणि अर्थात प्रवीण तरडे आणि संकर्षण यांचे हलके फुलके विनोद हसवतात, देवीचा गोंधळ मधे मुक्ता ला उत्स्फूर्त नाचताना पाहून तिचे फॅन्स खुप खुश झालेले पहायला मिळाले. या शिनेमाची गाणीदेखील
उत्तम जमली आहेत, एकीकडे भाऊ कदम यांचा हळवेपणा डिओपी आणि (त्यागराज) कोरिओग्राफर यांच्या कॉमिक कॅराक्टर्स ना सोबत घेऊन उर्वी एक सक्षम डिरेक्टर कशी होईल, आणि तिच्या वर प्रेम करणाऱ्या मुलास उर्वी स्वीकारते का ? आणि तो नक्की कोण आहे याची उत्सुकता तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीशी धरून ठेवते.
अगदी शेवटी हैप्पी एन्ड करत डॉ सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या संगीत कारकिर्दी सोबतच डिरेक्टर चा तुरा देखील फेट्यात खोचला हे मात्र खरे..
अशा या शिनेमास चला हवा करूया देत आहेत चार स्टार्स.. फॅमिली सिनेमा आहे आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन लवकरात लवकर नक्की पाहा !
रोजच्या धकाधकीच्या जीवनात दोन क्षण विरंगुळ्याचे मिळतील ही खात्री आम्ही देतो!!