चला हवा करू या – ‘जिद्दी दिल माने ना’ ही मालिका सोनी सब वर ३० ऑगस्टपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आर्मी च्या पार्श्वभूमीवर आधारित असून, याच्या प्रोमो ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या मालिकेत आपल्याला एक मराठी कलाकार दिसणार आहे आणि तो म्हणजे आदित्य देशमुख. आदित्यने या सीरियल मध्ये फैझी ची भूमिका साकारली आहे आणि तो म्हणतो की एका आर्मी ऑफिसर ची भूमिका एकदा तरी साकारता येणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि जेव्हा Sunshine Production ने मला या पात्रासाठी विचारलं तेव्हा मी नाही म्हणूच शकलो नाही.
या भूमिकेच्या तयारीसाठी आदित्यला प्रचंड ट्रेनिंग करावं लागलं. आर्मी ऑफिसर दिसण्यासाठी त्याला त्यांच्यासारखं चालणं, बोलणं आणि राहणं शिकावं लागलं. त्यांचं ट्रेनिंग आर्मी सारखंच पहाटे चार वाजता सुरू व्हायचं, या दरम्यान त्याला अगदी एका आर्मी ऑफिसर सारखं वाटलं.
या सीरियल चे शूटिंग एखाद्या चित्रपटासारखं किवा वेबसीरीज सारखं केलेलं असून ते प्रेक्षकांना टीव्ही वर सिनेमाचा अनुभव देईल. याच्या शूटिंग मध्ये अनेक बारीक सारीक गोष्टींची काळजी घेतली आहे आणि सेट सुद्धा त्याचप्रमाणे बनवले आहेत. या मालिकेसाठी आदित्यला आणि संपूर्ण टीम ला हार्दिक शुभेच्छा!
-प्राची बोरामणिकर