चला हवा करू या – आपल्या सुंदर लूक्स ने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रुती मराठे ची कदाचित आता प्रेक्षकांना जरब वाटेल. घाबरू नका, रुद्रकाल या हिंदी मालिकेत श्रुती एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. स्मिता ठाकूर असे तिच्या भूमिकेचे नाव असणार आहे. ही सिरीज स्टार प्लस वर ७ मार्च पासून दर रविवारी सायं. ७ वाजता प्रसारित होणार आहे.
View this post on Instagram
२८ फेब्रुवारी ला हॉटस्टार वर या मालिकेचा पहिला भाग प्रसिद्ध झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊन दरम्यानचे विविध लुक्स मधील श्रुतीचे फोटोशूट्स देखील खूप गाजले. यापूर्वी श्रुतीने झी मराठीवरील जागो मोहन प्यारे या मालिकेत भानूचे काम केले होते.
View this post on Instagram
लवकरच श्रुती एका साऊथच्या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुद्रकाल या मालिकेसाठी तसेच आगामी प्रोजेक्ट्स साठी श्रुतीला खूप शुभेच्छा !!