चला हवा करू या – पवित्र रिश्ता या मालिकेला नुकतेच १२ वर्ष पूर्ण झाले आणि आता १२ वर्षांनंतर पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला एका नव्या रुपात येणार आहे. ही मालिका आणि त्यातल्या कलाकारांनी खूप कमी वेळात रसिकांची मने जिंकली होती आणि आजही मानव नाव ऐकताच पहिले सुशांत सिंग राजपूत डोळ्यांसमोर येतो.
पवित्र रिश्ता २.० मध्ये मानवच्या भूमिकेत अभिनेता शाहीर शेख हा आपल्याला दिसणार आहे आणि अंकिता लोखंडे अर्चनाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पवित्र रिश्ता ही मालिका परत येणार अशी बातमी प्रेक्षकांना कळल्यापासून, मालिकेत कोण कोण कलाकार बघायला मिळतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक अतिशय आतुर होते.
View this post on Instagram
उषा नाडकर्णी आणि अंकिता लोखंडे या दोन मराठी अभिनेत्रींसोबत आणखी एक मराठी कलाकार म्हणजे सगळ्यांची लाडकी अभिज्ञा भावे सुद्धा या मालिकेद्वारे आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच तिने तिचा लुक सोशल मीडिया वर शेअर केला आहे.
सिरियल चे शूटिंग सुरू झाले असून प्रेक्षकांना ही मालिका ओटीटी माध्यमावर वर पाहायला मिळणार आहे.