चला हवा करू या – झी मराठीने नवीन मालिकेचा प्रोमो नुकताच लॉन्च केला.. ‘पाहिले न मी तुला’ असे या नवीन मालिकेचे नाव आहे.या मालिकेमध्ये अभिनेता शशांक केतकर, आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री तन्वी मुंडले या तिघांच्या प्रमुख भूमिका आहेत. आशय ने यापूर्वी झी मराठीच्याच माझा होशील ना या सुप्रसिद्ध मालिकेत डॉ. सुयश नकारात्मक भूमिका साकारली आहे आणि भूमिकेमुळे तो लोकप्रिय देखील झाला आहे. आता या मालिकेत तो सकारात्मक भूमिकेत दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CK_tVsxjD4O/?utm_source=ig_web_copy_link
शशांक ने यापूर्वी कलर्स मराठीवर हे मन बावरे या मालिकेत सिद्धार्थची भूमिका साकारली होती. त्याची भूमिका काहीशी नकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. तर अभिनेत्री तन्वीने आत्ताच शूट झालेल्या प्रकाश कुंटे यांच्या कलरफुल या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता ललित प्रभाकर यांच्यासोबत काम केले आहे. १ मार्च पासून सायं ७ वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे.. या मालिकेच्या प्रॉडक्शनची धुरा कोठारे व्हिजन सांभाळत आहेत.