चला हवा करू या – झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत डॉ.अजितच्या गावात एक नवीन मुलगी येणार आहे. प्रोमो पाहून, मंजुळाला मारल्यानंतर डॉ.अजितचे नवीन सावज कोण असणार? ती नवीन मुलगी कोण असेल, तिची भूमिका करणारी अभिनेत्री कोण असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अभिनेत्री नेहा खान ही त्या नवीन तरुणीची भूमिका साकारत आहे. ती आता अजितच्या गावात येणार आहे.
ही मुलगी अजितला धडा शिकवणार की तीसुद्धा त्याच्या जाळ्यात अडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नेहा खानला यापूर्वी आपण शिकारी या चित्रपटात बोल्ड अवतारात पाहिले होते.