चला हवा करू या – शुभमंगल ऑनलाईन या कलर्स मराठीच्या मालिकेत आता एक उत्कंठावर्धक ट्विस्ट आलेला आहे. शंतनूला ऐश्वर्याने केलेल्या खोट्या आरोपांमुळे पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खटला सुरू आहे. त्याचे देसाई वकिल व शर्वरी यांच्यामध्ये वादविवाद झाल्यामुळे देसाई वकिलांनी त्याची केस सोडली आहे. त्यामुळे ती दुसऱ्या वकिलांच्या शोधात आहे. पण शर्वरीकडे वकिलीची सनद असल्यामुळे तीच आता शंतनूची वकील म्हणून लढणार आहे. नुकतेच या सीन चे चित्रीकरण पार पडले.
ऐश्वर्याने सर्वच बाजूंनी कोंडी केलेली असताना शर्वरी शंतनू ला कशी सोडवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सुयश टिळक सायली संजीव,समिधा गुरू यांसह मिलिंद फाटक, सुकन्या मोने,गुरू दिवेकर या मालिकेतील सर्वांच्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहेत.