चला हवा करू या – हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट झिम्मा चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. कालपासून ट्विटर वर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सायली संजीव,मृण्मयी गोडबोले यांच्या एकमेकींमध्ये ट्रिप ला जाण्यावरून गप्पा रंगल्या होत्या. तेव्हाच हे आगामी चित्रपटाचे प्रमोशन आहे की काय असे सर्वांना वाटले होते. याच चर्चेत या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने देखील सहभागी होऊन उद्या सकाळी १० वाजता सांगतो असे म्हणून सर्वांचू उत्सुकता ताणून धरली होती.
View this post on Instagram
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ट्विटर वर सक्रिय नसल्यामुळे त्याने इन्स्टाग्राम वरून हिंट दिली होती. त्याच्या ट्विटर वरच्या फॅनक्लब ने त्याच्या बाजूने काही पोस्ट्स टाकल्या. आज सकाळी या चित्रपटाचे पोस्टर सर्वत्र रिलीज झाले. २३ एप्रिल २०२१ ला हा चित्रपट रिलीज होत आहे. नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ अशी टॅग लाईन असलेले हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत यांच्यासह सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग,सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसून येत आहेत.
View this post on Instagram
या सगळ्या महिला मंडळा बरोबर सिद्धार्थ ट्रिप ला जातो तेव्हा काय धमाल घडते, बहुधा अशीच काहीशी स्टोरी असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग लंडन मध्ये झाले आहे. कोरोना मुळे चित्रपटगृहे परत सुरू झाल्यानंतर ही मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूजच म्हणावी लागेल. या चित्रपटाच्या संपूर्ण टीम ला चला हवा करू या तर्फे हार्दिक शुभेच्छा !
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram