“हॅशटॅग प्रेम” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुयश टिळक व अभिनेत्री मिताली मयेकर यांचे हटके लुक्स या ट्रेलर मधून दिसून येत आहेत. या दोघांची जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच समोर येत आहे.
आजच्या काळातील रिलेशनशिप्स वर हा चित्रपट बेतलेला आहे. सोशल मीडिया चा खूप प्रभाव आजच्या तरुणाईवर पडलेला आपल्याला दिसतो. हा चित्रपटही अशाच काहीशा संकल्पनेवर आधारित आहे. कोकणात, निसर्गसौंदर्य असलेल्या ठिकाणी या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग पार पडले आहे.
हा चित्रपट १९ मार्च ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे टायटल सॉंग या आधीच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आणि त्यातल्या मितालीच्या नृत्यातील अदा पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
या चित्रपटाच्या संपूर्ण टीम ला चला हवा करू या तर्फे हार्दिक शुभेच्छा.