चला हवा करू या – अभिनेता सागर कारंडे व त्यांची पत्नी सोनाली यांनी माझ्या नवऱ्याची बायको च्या सेट वर गुलाबजाम पाठवले. या मालिकेची नायिका राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते व सागर कारंडे हे एकमेकांचे खूप छान मित्र आहेत. आपल्या या खास मैत्रिणीसाठी ने ही खास भेट सेटवर पाठवली.
अभिनेता अभिजीत खांडकेकर (गुरुनाथ), प्रवीण डाळिंबकर (रघू ),अभिनेत्री रुचिरा जाधव (माया), किशोरीताई अंबिये (सुलक्षणा),ईशा केसकर, यांच्यासह माझ्या नवऱ्याची बायको च्या संपूर्ण टीम ने या गुलाबजाम पार्टी चा मनसोक्त आनंद घेतला. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सागर सध्या झी मराठी वरच्या चला हवा येऊ द्या सोबतच झी युवा च्या डॉक्टर डॉन या मालिकेत तसेच इशारो इशारो में या नाटकामध्ये काम करत आहेत.