चला हवा करू या – अभिनेता ऋषी सक्सेना चा आज वाढदिवस आहे! झी मराठी च्या तुफान गाजलेल्या काही दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांची माने जिंकलेला शिव म्हणजेच ऋषी सक्सेना ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! काहे दिया.. नंतर त्याने फत्तेशिकस्त या मराठी चित्रपटात काम केले तसेच मूव्हिंग आउट सिझन २ यामध्ये देखील त्याने काम केले आहे.
View this post on Instagram
नुकताच त्याच्या पुढील वेबसीरिज चा प्रोमो देखील आला आहे.. गुड बॉय असे या सिरीजचे नाव आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रीना अगरवाल, खुशबू तावडे, अभिनेता विनय येडेकर,अभ्यंग कुवळेकर , दुष्यंत वाघ यांच्या देखील भूमिका आहेत. ही सिरीज आजच हंगामा प्ले, एम एक्स प्लेयर वर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
View this post on Instagram
ऋषी त्याच्या चॉकलेट बॉय लुक्स मुळे तसेच फिटनेस च्या फोटोज ,व्हिडीओज मुळे प्रेक्षकांची मने सतत जिंकत असतो..
त्याच्या नवीन वेबसिरीज ला तसेच त्याच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!
View this post on Instagram