‘माझा होशील ना’ : आदित्य आणि सईचे होणार लग्न ?

No Comment Yet

चला हवा करू या  – झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत अखेर सई व आदित्य चा विवाह सोहळा पार पडणार आहे. सध्या चालू असलेल्या ट्रॅकनुसार ‘ब्रम्हे boys’ सई ला तिच्याच लग्नातून पळवून आणणार आहेत. यासाठी सर्व मामांनी व आदित्यने वेषांतर केले आहे. मागील आठवड्यात आदित्य ने सई ला मागणी घातली व सई ने देखील होकार दिला आहे. पण डॉ. सुयश ने सईच्या वडिलांना कोर्ट कचेरी ची धमकी दिल्यामुळे सई नाईलाजाने या लग्नासाठी तयार झाली आहे. आपल्या भाच्याच्या सुखासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेले मामा व आप्पा आता आदित्यला मदत करणार आहेत आणि सईला पळवून आणून आदित्यशी लग्न लावून देणार आहेत.

या ट्रॅक चे नुकतेच चित्रीकरण झाले. या चित्रिकरणाच्या वेळी वेगवेगळ्या चॅनेल्स ना दिलेल्या मुलाखतीमध्ये सई आणि आदित्य यांनी वेगवेगळे उखाणे घेतले..आता सई चे लग्न होऊन ती आदित्य च्या घरी आल्यानंतर ‘माझा होशील ना’ या टायटल चा खरा अर्थ उलगडणार आहे.. मामांसोबत आदित्य सई चा ही होईल ना हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *