Shruti Marathe | फॅन्स सोबत श्रुतीने केला तिचा वाढदिवस सेलिब्रेट!

No Comment Yet

चला हवा करू या  – श्रुती ही तिच्या फॅन्स सोबत नेहमीच संपर्कात असते. गेल्या वर्षी कोव्हिड मुळे कोणाला भेटता येत नव्हते परंतु यावर्षी तिच्या फॅन्स ने तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्याचे ठरवले. श्रुति गेले काही दिवस पुण्यात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाचे शूटिंग करत होती. याचेच निमित्त साधून तिच्या फॅन्स ने तिला बोलावून तिचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.

कोव्हिड च्या नियमांचे पालन करून हा सोहळा पुण्यात पार पाडला. यामध्ये श्रुती मराठे फॅन्स क्लब,तसेच पसाय इन्व्हेंटो यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करून ,श्रुतिच्या फॅन्सशी संपर्क साधून,त्यांना बोलावले.

यामध्ये पुणे, नांदेड, पनवेल, या आणि अशा अनेक ठिकाणांहून श्रुतीचे फॅन्स आले होते.अनौपचारिक गप्पाटप्पा, केक कटिंग आणि स्नॅक्स असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. सर्व फॅन्स नी तिच्याशी विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या, श्रुतीनेही त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *