चला हवा करू या – मागच्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार विवाह बंधनात अडकले आणि या महिन्यात “हे मन बावरे” या मालिकेतल्या सम्राट तत्ववादी, म्हणजेच संग्राम समेळ यांनी सुद्धा त्या यादीत प्रवेश केला आहे.
संग्राम लचे लग्न श्रद्धा पाठक या डान्सर शी झाले असून हे arranged marriage आहे. अगदी कंडेपोजे पद्धतीने बघाबघी नंतर त्यांचे लग्न ठरले. हे लग्न इचलकरंजी मध्ये मोजक्या पाहुण्यांसोबत अगदी सुरेख पद्धतीत पार पडले. या सोहळ्याला संग्राम व श्रद्धाच्या कुटुंबासोबत जवळचे काही मित्र – मैत्रिणी सुद्धा हजर होते.
संग्राम व श्रद्धा च्या फॅमिली व मित्रांनी सोशल मीडिया वर हे फोटो टाकले व त्यामुळे संग्राम च्या फॅन्सला अचानक खूप मोठं surprise मिळालं. आज पर्यंत संग्राम ने अनेक सीरियल व चित्रपट केले. पुढचं पाऊल या मालिकेतल्या समीर या भूमिकेतून तो घरोघरी पोचला. त्यानंतर ललित २०५ ही त्याची मालिका तसेच sweety सातारकर, विकी वेलिंगकर हे चित्रपट ही गाजले.. संग्राम हा कलेच्या घराण्यातून आला असून ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ व अभिनेत्री संजीवनी समेळ यांचा तो चिरंजीव आहे. संग्राम व श्रद्धा ला भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा !