चला हवा करू या – (प्राची बोरामणीकर) सुहास शिरवळकर यांच्या समांतर या पुस्तकावर आधारित समांतर २ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एम एम्स प्लेयर वर येणार आहे. या सीरिज मध्ये स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असून याचे दिग्दर्शन समीर विद्वंस यांनी केलं आहे. या सीरिज मध्ये स्वप्नील जोशी प्रेक्षकांना ‘कुमार महाजन’ या भूमिकेत तसेच ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज ‘सुदर्शन चक्रपाणी’ या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील.
समांतर १ मध्ये कुमार महाजन याचे आयुष्य सुदर्शन चक्रपाणी यांनी त्याला स्वाधीन केलेल्या एका डायरी प्रमाणे घडतं, ज्यात कुमारचे भविष्य हाच सुदर्शनचा भूतकाळ असतो.
सीरिजच्या सीझन १ च्या शेवटी स्वप्नील म्हणजेच कुमारचे आयुष्य एका मनोरंजक वळणावर येऊन थांबलेले असून, सीझन २ ची घोषणा होताच पुढे काय होणार याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्यांची उत्सुकता अजून ताणण्यासाठी समांतर २ चे ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
यामध्ये स्वप्नीलच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साकारली असून कुमार च्या आयुष्यात आता “ती बाई” येणार आहे.. ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.