चला हवा करू या – हेमंत ढोमे यांचा बहुचर्चित चित्रपट “झिम्मा” याचा टीझर जागतिक महिला दिनाच्या दिवशी लाँच करण्यात आला. महिलांनी भरलेल्या या ट्रेलर मध्ये आपल्याला सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी या सर्व अभिनयात कसलेल्या स्त्रिया दिसल्या. हा टीझर अतिशय गंमतशीर आणि फ्रेश असून यामध्ये प्रत्येक स्त्री ची एक गोष्ट आपल्याला थोडक्यात बघायला मिळत आहे. यात सुरवातीला निर्मिती सावंत लंडन ला जायची परवानगी मागताना दिसतात व अनेक प्रश्न विचारल्यावर त्या “एकटी पण जाऊ शकते” असे सांगतात. पुढे अभिनेत्री सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सुहास जोशी अशा विविध पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांचे आपल्याला काही किस्से दाखवलेले आहेत. सिनेमात अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याने tour guide ची भूमिका साकारली असून आता या स्त्रिया लंडन मध्ये एकमेकींना कशा भेटतात आणि पुढे काय होतं हे आपल्याला चित्रपट पाहूनच कळेल.
View this post on Instagram
हा टीझर लाँच होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं व सिनेमाच्या सगळ्या cast ने ते आपल्या सोशल मीडिया वर देखील “सात बाई सात, बायका सात; जीवाची सफर, आता राणीच्या देशात” या कॅप्शन सोबत टाकलं. त्यावर त्यांना अनेक शुभेच्छा मिळाल्या. खुद्द अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या ट्विटर हँडल वरून हा टीझर शेअर करून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत!!
या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून हा चित्रपट २३ एप्रिल ला प्रदर्शित होत आहे.