सिद्धार्थ-मितालीच्या लग्नात ‘हिने’ घेतले लक्ष वेधून..

No Comment Yet

चला हवा करू या  – नुकतंच मराठी सिनेसृष्टीमधील लाडाच्या लेकीच म्हणजेच मिताली मयेकरचं chocolate boy सिध्दार्थ चांदेकरशी थाटा-माटात लग्न झालं. हे लग्न पुण्याच्या ढेपे वाड्यात २४ जानेवारी रोजी अगदी राजेशाही थाटात मोजक्या पाहुण्यांसोबत पार पडलं. मितालीच्या पारंपरिक नऊवारी साडी आणि दागिन्यांमुळे, आणि सिद्धार्थ चा रॉयल ब्लू कुर्ता , धोतर आणि शेल्यामुळे लग्नाचा रॉयल लूक आणखीन वाडला.

लग्नाचे व लग्नापूर्वीच्या विधीचे फोटो दोघांनी त्यांचा सोशल मीडियावर टाकले होते ज्यात ते दोघंही मेड फॉर इच अदर दिसतायत. लग्नसोहळा खास व्हावा यासाठी प्रत्येक गोष्टीकडे खास लक्ष दिलं होतं. या कार्यक्रमात #tinypanda ची लाडकी डोरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. डोरा साठी एक खास कॉश्च्युम शिवून घेतला होता..

या लग्नात #SidGotATali हा हॅशटॅग viral झाला.
आपल्या व्यग्र शेड्युल मधून वेळ काढून सिने सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सई ताम्हणकर, हेमंत ढोमे- क्षिती जोग,उमेश कामत, फ्रेशर्स सिरीयल ची संपूर्ण गॅंग, अपूर्व रांजणकर,आशुतोष गोखले,विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे,सखी गोखले,गायत्री दातार, पूर्णिमा डे, ऋतुजा बागवे, अभिषेक देशमुख,कृतिका देव, ऋषी सक्सेना, ईशा केसकर,पर्ण पेठे-आलोक राजवाडे इत्यादी सिनेसृष्टीतील कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली व वधू वरांचा उत्साह वाढवला. लग्नाच्या आधी हळद,मेहंदी,संगीत या सर्व कार्यक्रमांत देखील सर्वांनी उत्साहाने भाग घेतला.. त्यामधील त्यांचे कॉश्च्युम्स वाखाणण्याजोगे होते. शिवानी पाटील हिने स्टॅयलिंग केले होते.

सौरभ कापडे व शीतल पलसंदे यांनी मेकअप व हेअरची जबाबदारी पार पाडली.. लग्नाच्या वेळी दोघांचीही ग्रँड एन्ट्री झाली. मितालीच्या कन्यादानाच्या विधीसाठी रिअल लाईफ आई बाबांसोबतच रील लाईफ मधील बाबा- लाडाची मी लेक गं मधील मितालीचे बाबा- उमेश जगताप हे देखील आवर्जून उपस्थित होते. अशा या गोड कपल ला चला हवा करू या तर्फे खूप खूप शुभेच्छा! नांदा सौख्यभरे, आणि हवा करत राहा!!!

– प्राची बोरामणीकर

chalahavakaruya
Up Next

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *