चला हवा करू या – समांतर १ संपल्यापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती ती समांतर २ कधी येणार आणि “ती बाई” कोण असणार. ट्रेलर रिलीज झाल्यावर हे सरप्राईज उघड झाले. १ जुलै ला समांतर २ ही वेबसिरिज रिलीज झाली, तेव्हापासून सई ताम्हणकर वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय.
View this post on Instagram
सई ने या वेबसिरिज मध्ये सुंदरा आणि मीरा या २ भूमिका इतक्या ताकदीने साकारल्या आहेत, की प्रेक्षकांना तिचा अभिनय भावतो आहे. आता जुलै महिन्यातच सई चा अभिनय असलेला हिंदी चित्रपट मिमी हा रिलीज होत आहे..
यामध्ये सई बॉलीवूड चे अभिनेते पंकज त्रिपाठी आणि कृति सेनन यांच्यासोबत दिसणार आहे. सई यामध्ये शमा ही भूमिका करणार आहे. यामधले परम सुंदरी हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे ज्याला ए आर रेहमान यांचे संगीत वर श्रेया घोषाल चा आवाज आहे. या गाण्यावर सई कृती सोबत डान्स करताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
सई च्या डान्स चे तिच्या इंडस्ट्री मधील मित्र मैत्रिणींनी कौतुक केले आहे. हा चित्रपट सरोगेट मदर वर आधारित आहे. ३० जून ला या चित्रपटाचा डिजिटल प्रीमिअर नेटफ्लिक्स व जिओ सिनेमा वर होणार आहे.याशिवाय सई चे इंडिया लॉकडाउन, कलरफुल, पॉंडीचेरी, मिडीयम स्पायसी हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.