चला हवा करू या – प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित लव सुलभ या चित्रपटाचे पोस्टर ९ मार्च रोजी सोशल मीडिया द्वारे लाँच करण्यात आले. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शनासोबत अभिनय सुद्धा करत आहे आणि यात त्यांची साथ प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे या दिग्गज कलाकारांनी दिली आहे. पोस्टर मध्ये एक मेंदी काढलेल्या हाताने पिवळ्या भिंतीवर स्त्री- पुरुषाची आकृती काढलेली दिसत आहे ज्यावरून ही एक प्रेमकथा असल्याचा अंदाज बांधू शकला जाऊ शकतो.
View this post on Instagram
या चित्रपटात प्रियदर्शन जाधव हे लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी पार पाडणार आहेत तर चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड व कलादिग्दर्शन सतीश चिपकर करणार आहेत. प्रभाकर परब निर्मित आणि आकाश पेंढरकर, सचिन नारकर, विकास पवार आणि विशाल घाग सहनिर्मित या चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.