चला हवा करू या – माझ्या नवऱ्याची बायको या सीरिअल मधून घरा घरात पोचलेली राधिका सुभेदार म्हणजेच अनिता दाते-केळकर हिने काही दिवसांपूर्वी एक glamorous फोटोशूट केले. तिच्या या फोटोंना फॅन्स नी भरभरून लाईक्स दिल्या व कॉमेंट्स मधून तिचे कौतुक सुद्धा केले. या उत्तम अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. टीव्ही वर कायम साडी किवा सलवार कुर्ता मध्ये दिसणाऱ्या अनिताचा,जीन्स- टॉप च्या casual लूक सर्वानाच फार आवडत आहे.

Anita Date-Kelkar
अनिताला आपण नुकतंच झी मराठी वर महाराष्ट्राची लावण्यवती या कार्यक्रमात हार्दिक जोशी बरोबर सवाल जवाब हा एक वेगळ्या धाटणीचा ऍक्ट सादर करताना पाहिला. या act साठी तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तिचा हा लुक देखील सर्वांना खूपच आवडतोय..
सध्या माझ्या नवऱ्याची बायको मध्ये गोट्या शेठ जेनीचं अपहरण करणार आहे, तर जेनिला त्याच्यापासून सोडवायला राधिका काय करतेय हे जाणून घ्यायला सगळे आतूर आहेत. येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी ला दुपारी २ व रात्री ९ वाजता माझ्या नवऱ्याची बायको चा महाएपिसोड झी मराठी वर प्रदर्शित होणार आहे.