डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित ” तू माझा होऊन ये ” अल्बम साँग चा प्रदर्शन सोहळा पुण्यातील KYTA हॉल मध्ये संपन्न झाला. गाण्यातील कलाकार , दिग्दर्शक , निर्माते , गायक आणि तंत्रज्ञ तसेच अभिनेता सचिन गवळी , DYSP राजन जगदाळे , PSI अविनाश ढमे , ASI हनुमंत राजगे , अमालदार आशिष गायकवाड तसेच नंदकिशोर मेथा , शांतीलाल मेथा , शंकर भोसले , डॉ. चैत्राली गोगावले , साक्षी करवा , हिंदवी पाटील , राधिका सावंत , अनुष्री माने , रमा लांजेकर , साक्षी सुतार , साक्षी घुळे , सौरभ काळे , गणेश चोरघे , अमन गुप्ता , विनायक बागडे , शुभम कड , ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. तू माझा होऊन ये ह्या गाण्याचं दिग्दर्शन डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा ह्यांनी केलं असून गाण्याची निर्मिती नंदकिशोर मेथा तर सह निर्मिती डॉ. संकेत ढेकळे ह्यांनी केली आहे. काजवा फेम अभिनेत्री सृष्टी अंबावले आणि शिवराया रं फेम अभिनेता डॉ. गौरव भोसले मुख्य भूमिकेत असून डॉ. करण राजगे, डॉ. नम्रता जगदाळे , हृषिकेश लेकावळे , अभिनंदन गायकवाड हे सह कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
निलेश कटके लिखित तू माझा होऊन ये गाण्याला सुप्रसिद्ध गायक केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे ह्यांनी स्वर बद्ध केलं आहे. राज शिंदे ह्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून भागवत सोनावणे ह्यांनी रंगभूषा केली आहे. हे गाणं UNM PRODUCTION AND FILMS ह्या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झालं आहे.