समृद्धी जाधव ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून तिचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. एका सामान्य घरातून आलेली बिग बॉस मराठी ४ ची स्पर्धक आहे. बिग बॉस मराठी सिझन ४ च्या घरात ती सर्वात तरुण स्पर्धक असून तिने तिच्या खेळाने
सर्वांना भुरळ पाडली आहे. ह्या आधी ती splitsvilla १३ मध्ये सुद्धा दिसून आली होती.
बिग बॉस मराठी ४ च्या दसरा स्पेशल एपिसोडपासून कॅप्टन निवडीच्या टास्कला सुरुवात झाली होती. या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये समृद्धी जाधवने बाजी मारली असून ती बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन झाली आहे.
बिग बॉस मराठी सिझन ४ चा खेळ दुसऱ्या आठवड्यात पोहोचला असून सर्वच स्पर्धकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य पार पाडताना स्पर्धक बरेच आक्रमक होताना पाहायला मिळाले. या वेळी पहिल्या फेरीत खेळताना किरण माने आणि बिग बॉस मराठी सिझन ४ ची पहिली कॅप्टन समृद्धी जाधव ही खेळातून बाहेर पडली. या वेळी समृद्धी जाधव हिने मनाचा मोठेपणा दाखवून कॅप्टन असल्यामुळे खेळातून स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस यांच्या आदेशावरून हे दोघेही दुसऱ्या फेरीसाठी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.
या वेळी काही स्पर्धक नियमाच्या बाहेर जाऊन खेळल्याने आक्रमक झालेल्या बाकी स्पर्धकांनी घर दणाणून सोडले. संचालक असलेल्या समृद्धी जाधव आणि किरण माने यांच्यात देखील वादावादी झाली. या वेळी समृद्धी जाधव हिने स्वतःचा मुद्दा ठामपणे किरण माने यांच्या समोर मांडून एका निष्पक्ष संचालकाची भूमिका अत्यंत उत्तम रित्या पार पडली. या आधीच्या आठवड्यातील साप्ताहिक कार्यात देखील किरण माने हे संचालकाची भूमिका निभावत होते परंतु तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबत संचालक म्हणून खेळत असलेल्या निखिल राजेशिर्के यांना त्यांची मतं ठामपणे मांडू दिली नव्हती. तेव्हा महेश मांजरेकर यांनी निखिल यांना चांगलेच सुनावले होते. त्यामुळे यावेळी समृद्धी जाधव हिने मुद्देसूदपणे आपली मते मांडून एक चांगली स्पर्धकच नाही तर एक चांगली कॅप्टन असल्याचेही दाखवून दिले.
आक्रमकते बरोबरच समृद्धी हिचे हळवे मन देखील प्रेक्षकांना दिसून आले. साप्ताहिक कार्य सुरु होण्याआधी ज्या वेळी विकास हा बाकी स्पर्धकांकडून टार्गेट होताना दिसत होता त्यावेळी समृद्धी हिने विकास यांना प्रोत्साहन देऊन एक चांगली सदस्य असल्याचे दाखवून दिले.