[vc_row][vc_column][vc_column_text]
स्पर्धा करण्यापेक्षा अभिनयाचा आनंद घेण्यासाठी या – ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस
सिंधुदुर्ग : अभिनयाचा आनंद घेण्यास येणाऱ्यांसाठी हे क्षेत्र खूप मोठ आहे असे विधान ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांनी केले. सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल (एसएनएफएफ) च्या वतीने ‘तरुण आणि सिनेक्षेत्रातील प्रवास’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. प्रत्येकाला इथे सेलिब्रेटी व्हायचंय पण असे करण्यासाठी न येता या क्षेत्राचा निखळ आनंद घेण्यासाठी या असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते, जयवंत वाडकर, दिग्दर्शक प्रसाद तारकर, अंजली दिलीप, फेस्टिवल दिग्दर्शक सुमीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जामखंडे येथील टिळक स्मारक समितीत झालेल्या या चर्चासत्रात देवगडवासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.
कंटेनर थिएटर संकल्पना सरकारने राबवायला हवी असे आवाहन यावेळी ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी केले. कलागुण असतील तर तुम्हाला संधी नक्की मिळेल असेही त्यांनी सांगितले. अभिनय क्षेत्राला कोकणाने खूप दिलंय असे सांगत तुम्हाला काय व्हायचंय हे निश्चित करा असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांनी केले. या क्षेत्रात येण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याची गरज यावेळी सविता मालपेकर यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग नॅशनल फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी सुमीत पाटील दिग्दर्शित तरंग आणि प्रियाशंकर घोष दिग्दर्शित गॉडनेस इन द मॉस्क्यू या लघुपटांचा विशेष प्रयोग होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता या फेस्टिवलचा सांगता समारंभ पार पडेल. यावेळी आ.नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/1″][vc_images_carousel images=”876,877″ img_size=”500×400″ slides_per_view=”2″ autoplay=”yes”][/vc_column][/vc_row]